प. पू. गुरूवर्य गुरुदेवजी श्री. महंकालेश्वरनाथजी भैरव
आमचे आद्य गुरू

प. पू. गुरूवर्य गुरुदेवजी
श्री. महंकालेश्वरनाथजी भैरव

आघोर पंथाचे श्रेष्ठ संत, समाजसेवक आणि अध्यात्मिक गुरू. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आखाड्याची सेवा कार्य अविरत सुरू आहे.

"सत्य हाच खरा धर्म. सेवा हीच खरी भक्ती."

आखाड्याचा इतिहास

ॐ आघोरेश्वर महादेव भैरव आखाडा हा प्राचीन आघोर परंपरेचा वारसा पुढे नेणारा एक आध्यात्मिक आणि सामाजिक संस्था आहे. आघोर पंथ हा शैव परंपरेतील एक प्राचीन संप्रदाय आहे, जो सत्य, शिव आणि सुंदर या तत्त्वांवर आधारित आहे.

आखाड्याची स्थापना प. पू. गुरूवर्य गुरुदेवजी श्री. महंकालेश्वरनाथजी भैरव यांनी केली. त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजसेवा आणि अध्यात्मिक ज्ञानाच्या प्रसारासाठी समर्पित होते. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली आखाड्याने अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक उपक्रम राबवले.

आज हा आखाडा परंपरा, सेवा आणि अध्यात्म यासाठी समर्पित असून, समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून त्यांच्या उन्नतीसाठी कार्यरत आहे.

गुरूशिष्य परंपरा

आद्य गुरुपासून आजपर्यंतची अखंड परंपरा.

परदादा गुरू — उगम
ब्रह्मलीन परदादा गुरू
श्री श्री श्री १००८ महंत योगिराज
डॉ. रामनाथजी अघोरी
गुवाहाटी, आसाम
दादागुरू — कालाबाबा
ब्रह्मलीन दादागुरू
श्री श्री श्री १००८ ब्रह्मलीन महंत
केदारनाथजी अघोरी
गुवाहाटी, कामाख्या — आसाम
दादीगुरू — माँ
दादीगुरू माँ
श्री श्री श्री १००८ महंत तंत्राचार्य
डॉ. कमलानाथजी माई
गुवाहाटी, आसाम
गुरू महाराज
गुरू महाराज
श्री श्री श्री १०८ महंत तंत्राचार्य
डॉ. जिद्दीनाथजी औघडपीर
पुणे, महाराष्ट्र
महंकालेश्वरनाथजी भैरव
गुरूवर्य — संस्थापक
प. पू. गुरूवर्य गुरुदेवजी
श्री श्री महंकालेश्वरनाथजी भैरव
॥ भैरव आखाडा पंथ उगम ॥
पुणे, महाराष्ट्र

आखाड्याचा प्रवास

स्थापनेपासून आजपर्यंतचा आखाड्याचा विकास.

स्थापना

प. पू. गुरूवर्य गुरुदेवजी यांनी आखाड्याची स्थापना केली. आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याची सुरुवात.

सेवा विस्तार

समाजसेवेच्या विविध उपक्रमांना सुरुवात. शैक्षणिक, आरोग्य आणि धार्मिक क्षेत्रात कार्य.

आज

परंपरा जपत आधुनिक काळातील गरजांनुसार सेवा कार्य सुरू. पारदर्शकता आणि समर्पण हे आमचे बळ.